Rohit Sharma: 'मुंबईचा राजा' रोहित शर्मा वानखेडेवर खेळणार शेवटचा कसोटी सामना?; लवकरच करणार मोठी घोषणा
भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकेतील पहिल्या दोन सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करत मालिका जिंकली आहे.
आता तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
भारताच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी रोहित शर्माबाबत एक वृत्त समोर येत आहे.
न्यूझीलंड विरुद्ध वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणारा तिसरा कसोटी सामना रोहित शर्माचा शेवटचा सामना असेल असं सांगण्यात येत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर पुढील वर्षभर टीम इंडिया भारतात कसोटी सामने खेळणार नाही.
तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये असणार आहे.
भारत जर या अंतिम सामन्यासाठी पात्र झाल्यास या सामन्यातनंतर रोहित शर्मा कसोटीतून निवृत्तीची घोषणा करु शकतो. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणारा तिसरा कसोटी सामना रोहित शर्माचा भारतातील शेवटचा सामना ठरु शकतो.
दरम्यान, टीम इंडियाने टी-20 विश्वचषक पटकावल्यानंतर रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.