IND vs NZ Final : न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलआधी रोहित शर्माला भरली धडकी; नवीन टेन्शन समोर, पुन्हा भारताचं स्वप्नांचा चुरडा होणार?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडचा सामना करणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या स्पर्धेत टीम इंडियाने प्रत्येक सामना जिंकला आहे, पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला या संपूर्ण स्पर्धेत एकही नाणेफेक जिंकता आलेली नाही.

आतापर्यंत सर्व काही ठीक आहे, पण अंतिम सामन्यात रोहित शर्माला कोणत्याही परिस्थितीत टॉस जिंकावा लागेल, कारण जर तो यावेळी चुकला तर न्यूझीलंड टॉस जिंकू शकतो.
रोहितसाठी नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे आहे, कारण गेल्या 10 सामन्यांचा रेकॉर्ड याची साक्ष देत आहे.
जर आपण गेल्या 10 सामन्यांचे निकाल पाहिले तर, पाठलाग करणाऱ्या संघाने 7 सामने जिंकले आहेत.
2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहितने नाणेफेक गमावली आणि ऑस्ट्रेलियन संघाने तो सामना जिंकला.
टीम इंडियाने आतापर्यंत धावांचा पाठलाग करताना 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत.
त्याच वेळी, टीम इंडियाने एकदा न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करून सामना जिंकला होता.
खरं तर, दुबई स्टेडियमची खेळपट्टी खूपच संथ आहे. पण या खेळपट्टीवर संध्याकाळी फ्लडलाइट्सखाली थोडीशी फलंदाजी करणे सोपे मानले जाते.
गेल्या 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये या मैदानावर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला पाच वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
त्यापैकी टीम इंडियाने 4 जिंकले आहेत कारण रोहितने गेल्या चारही सामन्यांमध्ये टॉस गमावला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या 11 सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकला नाही.
अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला हा ट्रेंड मोडून कोणत्याही परिस्थितीत टॉस जिंकावा लागेल.