Satish Bhosale : सतिश भोसलेचे पाय आणखी खोलात; वन विभागाच्या हाती वन्यजीवांच्या शिकारीच्या साहित्यासह मोठं घबाड

बीडमधील भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाईचे एकापाठोपाठ एक कारनामे पुढे येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अशातच शिरुर कासार येथे एका व्यक्तीस बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भाई याने चक्क परिसरातील हरणांची शिकार करुन त्यांचे मास खाल्ल्याचं समोर आलं होतं. परिणामी वन विभागाच्या वतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.

अखेर आज वन विभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी धाड टाकत घरात तपास केला असता वन विभागाला वन्यजीवांच्या शिकारीचे मोठं घबाड सापडले आहे.
यात वन्यजीवांच्या प्राण्यांच्या मांससह धारदार शस्त्र, जाळी, वाघुर आणि बरच काही आढळून आलं आहे.
जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ याच्या मार्गदर्शनाने 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ही धाड टाकली असता तपासात मोर आणि हरिण मारणारे जाळेही आढळून आले आहे.
दरम्यान, वनविभागाला उशिरा जाग आल्याने वन्यजीवप्रेमी मधून संताप व्यक्त होत आहे. तर आता आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती ही पुढे आले आहे