खासदार उदयनराजे झाले डॉक्टर, कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे डॉक्टरेट बहाल
कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे खासदार उदयनराजे भोसले यांना डॉक्टरेट पदवी बहाल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉक्टरेट पदवीचे प्रमाणपत्र खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांच्या निवासस्थान जलमंदिर पॅलेस या ठिकाणी देण्यात आले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या सार्वजनिक सेवेतील समर्पण आणि समाजातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज या नात्याने त्यांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि सामाजिक उन्नतीसाठी बांधिलकीचा वारसा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आहे.
मराठा साम्राज्याचा अभिमान, वारसा आणि मूल्ये जपण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा समाजावर कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे.
3 मार्च 2025 रोजी अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे डॉक्टरेट ही पदवी देवून सन्मानित करण्यात आले आहे.
खासदार उदयनराजे भोसले हे सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहे. ते भाजपकडून लोकसभेवक गेले आहेत.
खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या सामाजिक योजगानाबद्दल त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली आहे.