Ind vs NZ 1st Test: आजपासून भारत- न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार; टीम इंडियाला दुखापतींचा फटका
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. (Image Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. (Image Credit-BCCI)
मालिकेतील पहिला सामना आज पासून रंगणार असून बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर हा सामना असेल. (Image Credit-BCCI)
पहिल्या कसोटी सामनादरम्यान हवामान खराब राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आजचा सामना उशीराने सुरु होऊ शकतो. (Image Credit-BCCI)
भारत दौऱ्याआधी न्यूझीलंडला श्रीलंकेमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध अडखळताना पाहिले होते. (Image Credit-BCCI)
भारताविरुद्ध जागतिक दर्जाच्या फिरकी माऱ्याविरुद्ध खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची मोठी कसोटी लागेल. (Image Credit-BCCI)
पहिल्या कसोटी सामन्याला शुभमन गिल मुकण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे शुभमन गिल पहिल्या कसोटीमधून बाहेर पडू शकतो. (Image Credit-BCCI)
बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने भारताने जिंकली. या विजयासह भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिले स्थान आणखी बळकट केले आहे. (Image Credit-BCCI)
पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप.(Image Credit-BCCI)