तिलक वर्माने भारताला जिंकून दिलं अन् सूर्या भाईला आनंद गगनात मावेना, मैदानावर येताच मारली मिठी!
भारत आणि इंग्लंड (India Vs England) यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका चालू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यावर भारताने नाव कोरलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर खेळवण्यात आला होता. भारताला विजय मिळवून देण्यात तिलक वर्मा याने मोलाची भूमिका बजावली.
इंग्लंडने भारताला जिंकण्यासाठी 166 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र तिलक वर्मा वगळता भारताच्या एकाही खेळाडूला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
मात्र तिलक वर्माने एकट्याने मैदानात पाय रोवून भारताला विजय मिळवून दिला. त्याच्या अफलातून फलंदाजीमुळे भारतााल दोन गडी राखून विजय मिळवता आला.
त्याने 55 चेंडूंत 72 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार तर 5 षटकार लगावले.
त्याच्या या धडाकेबाज खेळीची दखल खुद्द कर्णधार सूर्यकुमार यादवनेदेखील घेतली. सामना जिंकताच सूर्यकुमारने तिलक वर्माला आनंदाने मिठी मारली.
सोबतच तिलक वर्माचे अभिनंदन करत खाली वाकून त्याच्या फलंदाजीच कौतुक केले.
तिलक वर्माचे हार्दिक पांड्यानेही तोंडभरून कौतुक केले. मात्र सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला मिठी मारल्यानंतर सर्वच क्रिकेटप्रेमींच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या.