टॉपलेस फोटोशूट ते ड्रग्ज तस्करी, संन्यास घेतलेल्या ममता कुलकर्णीची तीन वादग्रस्त प्रकरणं ज्यानं सगळेच झाले होते अचंबित!
अभिनेत्री ममता कुलकर्णीने यापुढचे आयुष्य अध्यात्मिक मार्गाने जगण्याचा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळेच ती आता किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर झाली आहे. अंगावर भगवे वस्त्र परिधान करून तिने महामंडलेश्वर होण्याचा निर्णय घेतला आहे.
महामंडलेश्वर झाल्यानंतर आता ममता कुलकर्णी यमाई माता नंदी गिरी या नावाने ओळखली जाणार आहे.
ममता कुलकर्णीने आतापर्यंत तमिळ, बंगाली, मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांत काम केलेले आहे.
ममता कुलकर्णीने सलमान खानपासून ते शाहरुख खान यासारख्या बड्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केलेली आहे.
करण अर्जुन, सबसे बडा खिलाडी, आंदोलन, बाजी, नसीब यासारख्या हिट चित्रपटांत तिने भूमिका साकारलेली आहे.
सध्या तिने अध्यात्माचा मार्ग निवडला असला तरी यापूर्वी अभिनेत्री म्हणून कार्यरत असताना ती अनेकवेळा वादात सापडलेली आहे.
ममता कुलकर्णीने 1993 साली एका मॅगझीनसाठी चक्क टॉपलेस फोटोशूट केले होते. तिच्या या फोटोशूटमुळे चांगलाच वाद झाला होता.
बॉलिवुडमध्ये सक्रीय असताना ममता कुलकर्णीवर तिचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. तिने गँगस्टर छोटा राजन याला डेट केलं होतं, असं अनेक माध्यमांनी तेव्हा दावा केला होता.
ममता कुलकर्णी ही 2016 साली पुन्हा एकदा चर्चेत आली होती. तिचे नाव ड्रग्ज तस्करीशी जोडण्यात आले होते.
मात्र ममता कुलकर्णीने हे आरोप नेहमीच फेटाळलेले आहेत. सध्या मात्र ममता कुलकर्णी बॉलिवुडमध्ये सक्रिय नाही. तिने आता अध्यात्माचा मार्ग पकडला आहे.