Kolhapur : अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्याला नागरिकांकडून चोप
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी चोप दिलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून काही विकृतांनी मुलींची छेड काढत हुल्लडबाजी केली होती.
त्यानंतर गडहिंग्लज एसटी स्टँड समोर अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी संबंधित छेड काढणाऱ्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलंय.
गेल्या काही दिवसांपासून गडहिंग्लज परिसरात मुलींची छेड काढण्याचे प्रमाण वाढलंय.
गेल्या आठ दिवसातील मुलींची छेड काढण्याचा दुसरा प्रकार समोर आलाय.
त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी छेड काढणाऱ्यास चोप देण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे आता पोलीस प्रशासन देखील सतर्क झालंय.
पोलिसांनी उडाणटप्पू तरुणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर गडहिंग्लजमधील एसटी स्टँड परिसरात गर्दी झालेली पाहायला मिळाली.