Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : भारताचा इंग्लंडवर 49 धावांनी दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्या होमग्राऊंडमध्ये सलग दुसऱ्या टी20 सामन्यात मात देत तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 171 धावांते लक्ष्य ठेवले. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ 121 धावांवर सर्वबाद झाला.
भारताकडून रोहित शर्मा आणि ऋषभ पंत जोडीने तुफान फटकेबाजी केली. दोघांनीही दमदार खेळीला सुरुवात केली. पण इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसनने रोहितला 31 धावांवर तंबूत धाडलं. ज्यानंतर पंत (26) आणि कोहली (1) यांना एकाच षटकात ग्लीसननेच माघारी धाडलं.
ज्यानंतर भारतीय फलंदाज एका मागे एक बाद होऊ लागले.
पण रवींद्र जाडेजाने अनुभवाची कमाल दाखवत 29 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 46 धावा केल्या. ज्यामुळे भारतीय संघाने 171 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन सर्वाधिक 4 तर रिचर्ड ग्लीसनने 3 विकेट्स घेतल्या.
171 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच बॉलवर भुवनेश्वरने जेसन रॉयला तंबूत धाडलं. मग एका मागे एक इंग्लंडचे गडी बाद होतच होते. इंग्लंडकडून मोईन अलीने 35 आणि डेविड विलीने 33 ही सर्वाधिक धावसंख्या केली.
इंग्लंडचे इतर खेळाडू खास कामगिरी करुच शकले नाहीत.
भुवनेश्वरने सर्वाधिक 3 गडी यावेळी बाद केले. तर बुमराह आणि चहलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर पांड्या आणि पटेलने प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडचा एक गडी धावचीत झाला.
3 षटकात 15 धावा देत 3 गडी बाद करणाऱ्या भुवनेश्वरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
हा सामना जिंकल्यामुळे तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.