Photo : आम्ही छोटे वारकरी... चिपळूणमध्ये चिमुकल्या वारकऱ्यांची आषाढी उत्साहात
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
09 Jul 2022 08:15 PM (IST)
1
रविवारी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरीतील चिपळूण येथे छोट्या वारकऱ्यांनी आषाढी उत्साहात साजरी केली.
3
चिपळूण तालुक्यातील श्री विठ्ठराव जोशी चॅरिटी ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, डेरवमध्ये आज चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी पेहरावात उपस्थिती लावली.
4
यावेळी या छोट्या वारकऱ्यांनी हातात टाळ आणि डोक्यावर तुळस, गळ्यात तुळशीच्या माळा घालून हरी नामाचा गजर केला.
5
उद्या रविवार सुट्टी असल्याने आजच शाळेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली.
6
काही मुले विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात आले होते.
7
वेशांतर करुन आलेल्या या चिमुकल्या वारकऱ्यांची शाळा आज भरली होती.
8
विठू नामाच्या गजरावर, गाण्यावर ठेका धरत बच्चे कंपनी तल्लीन झाले होते.