IND vs BAN Sanju Samson : 11 चौकार, 8 षटकार संजूच्या धडाकेबाज 111 धावा, सर्व गोलंदाजांना धुतलं
IND vs BAN Sanju Samson : भारत विरुद्ध बांगलादेश टी 20 मालिकेतील तिसरा सामना आज (दि.12) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केलीये.
भारताचा फलंदाज संजू सॅमसन याने 11 चौकार, 8 षटकारांच्या सहाय्याने 46 चेंडूमध्ये 111 धावा ठोकल्या आहेत.
संजू सॅमसनने बांगलादेशच्या राशीद हुसनेच्या एकाच षटकात लागोपाठ 5 षटकार लगावले.
8 षटकार आणि 11 चौकारांच्या सहाय्याने संजू सॅमसने आंतरराष्ट्रीय टी 20 मधील चौथे सर्वात जलद शतक ठोकले.
संजू सॅमसन शिवाय सूर्यकुमार यादवने 75 धावांचे योगदान दिले.
बांगलादेशकडून तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहेमान आणि महम्मदुल्लाहने प्रत्येक 1 विकेट पटकावली.
राशिद हुसेन हा सर्वांत महागडा ठरला, त्याने 2 षटकांमध्ये 46 धावा दिल्या.
शिवाय संजू सॅमसनने त्यांच्या एकाच षटकात 5 षटकार लगावले.