Ind vs Ban: 'राजनाधी एक्सप्रेस' टीम इंडियाच्या ताफ्यात; BCCI ने केली गुपचूप तयारी, कोण आहे 22 वर्षीय मयंक यादव?
बीसीसीआयने बांगलादेशविरुद्ध 6 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मालिकेमधील पहिला टी-20 सामना 6 ऑक्टोबरला, दुसरा सामना 9 ऑक्टोबरला आणि मालिकेतील शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला होणार आहे.
पुन्हा सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियाचे टी-20 फॉरमॅटचे नेतृत्व देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या मालिकेत दोन खेळाडू पदार्पण करणार आहेत. यामध्ये मयंक यादव आणि नितीश रेड्डी या वेगवान गोलंदाजांना समावेश आहे.
आयपीएलमध्ये खेळताना मयंक यादवला दुखापत झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने विशेष खबरदारी घेत मयंक यादववर लक्ष केंद्रीत केलं.
मयंक यादवला टीम इंडियात सामील करण्यासाठी बीसीसीआयने गुपचूप तयारी सुरु केली होती.
आयपीएलमधील 2023 च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघाचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने 157 च्या वेगाने चेंडू टाकून जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली.
मयंक यादव देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो. मयंक यादव 22 वर्षांचा आहे. त्याचा जन्म 17 जून 2002 रोजी झाला.
मयंक यादवला एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जाते.