Shani Dev : शनी लवकरच चालणार सरळ चाल! दिवाळीनंतर 'या' राशींची होणार चांदी; लक्ष्मीची सदैव असेल कृपा
न्याय देवता आणि कर्मफळदाता शनीच्या राशी परिवर्तनाचा सर्वच 12 राशींवर परिणाम होतो. याचं कारण म्हणजे शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीचा अशुभ परिणाम हा दीर्घ काळापर्यंत टिकणारा असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या शनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे आणि उलटी चाल चालत आहेत. मात्र, काही दिवसांनी शनी कुंभ राशीत मार्गी होऊन सरळ चाल चालणार आहेत. याचा लाभ अनेक राशीच्या लोकांना होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी दिवाळीनंतर काही दिवसांनी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2024 रोजी मार्गी होणार आहेत. शनीच्या मार्गी होण्याचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
शनीच्या मार्गी होण्याने तुमच्या नशिबाचे दार खुले होतील. तुमच्या आयुष्यात यशाचे मार्ग खुले होतील. तसेच, समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
शनीच्या सरळ चालीने मिथुन राशीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. याचा भविष्यात तुम्हाला चांगलाच लाभ मिळेल. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहील. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.
शनी सध्या स्वराशी म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे आणि याच राशीतून मार्गी होणार आहेत. त्यामुळे याचा परिणाम कुंभ राशीच्या लोकांना सर्वात जास्त होणार आहे. या काळात तुमच्या जुन्या सर्व अडचणी दूर होतील. तसेच, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील.
मीन राशीच्या लोकांसाठी दिवाळीनंतरचा काळ फार शुभ असणार आहे. 15 नोव्हेंबरनंतर तुमच्या करिअरमध्ये चांगले बदल तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)