केवळ 20 रुपयात दोन लाखांपर्यंतचा विमा;पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेबाबत तुम्हाला माहितीय?
आपलं आयुष्य धकाधकीचं आणि अनिश्चिततेनं भरलेले आहे. केव्हा आणि कोणासोबत काय घटना घडेल, हे इथे काहीही सांगता येत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा अनपेक्षित घटनांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी लोक विमा पॉलिसी घेतात. परंतु जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी सर्व लोकांकडे पुरेसे पैसे नसतात.
अशा परिस्थितीत केंद्र सरकारमार्फत एक विशेष योजना राबवली जात आहे. ही विशेष योजना अशा लोकांसाठी उपयुक्त ठरते.
भारत सरकारनं 2015 मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली. ही एक अपघात विमा पॉलिसी आहे. या पॉलिसीद्वारे अपघातात मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास तुम्ही सरकारकडे क्लेम करू शकता.
18 ते 70 वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. योजनेअंतर्गत दरवर्षी 20 रुपये प्रीमियम भरावा लागतो. जे तुमच्या खात्यातून ऑटो डेबिट होतात.
योजनेंतर्गत दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर किंवा पूर्णतः विकलांग झाल्यानंतर दोन लाखांपर्यंतच्या क्लेम मिळतो. तर, दुर्घटनेत काही प्रमाणात विकलांग झाल्यानंतर एक लाख रुपयांपर्यंतचा क्लेम मिळतो.
योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, योजनेची अधिकृत वेबसाईट https://www.jansuraksha.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
इथे तुम्हाला स्कीम फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
यानंतर तुम्हाला तुमची योग्य माहिती त्यात टाकावी लागेल. तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन संबंधित कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करावा लागेल.