Ind vs Ban: टीम इंडियाचे खेळाडू मैदानात आले अन् काही मिनिटांत पुन्हा हॉटेलकडे निघाले; दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द

Ind vs Ban 2nd Test Match: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना कानपूर येथे खेळला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पहिल्या दिवशी पावसामुळे हा सामना दोन तास आधीच थांबवण्यात आला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीचा खेळ अजूनही सुरु होऊ शकलेला नाही.

कानपूरमध्ये आजही पाऊस पडत असल्याने संपूर्ण मैदाना झाकण्यात आले आहे.
सकाळी भारतीय संघाचे खेळाडू सरावासाठी मैदानात दाखल झाले होते. मात्र काहीवेळेनंतर सर्व खेळाडू पुन्हा हॉटेलकडे रवाना झाले आहेत.
बांगलादेशने पहिल्या डावात 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. मात्र यानंतर सामना सुरू होऊ शकला नाही.
आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कानपूरमध्ये पावसाने दिवसाची सुरुवात झाली.
पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.
या कारणामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हॉटेलमध्ये परतला.
टीम इंडियासोबत बांगलादेशी खेळाडूही हॉटेलकडे रवाना झाले.