Masai Plateau Kolhapur : मसाई पठारावर रंगबेरंगी फुलांची उधळण; असंख्य प्रकारची फुले बहरली
सातारा जिल्ह्यातील कास पठारावर फुललेल्या फुलांप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारावर देखील रंगबिरंगी फुल मोठ्या प्रमाणात फुलत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी सप्टेंबर महिन्यात कोल्हापुरात असणाऱ्या या पठाराकडे निसर्ग अभ्यासक आणि पर्यटकांची पावले वळू लागतात.
कारण हे पठार कोल्हापूरकरांसाठी 'खास' आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाच्या शेजारीच असणारे मसाई पठार सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली रंगीबेरंगी फुलांची उधळण केली आहे.
अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुक्याची दुलई यामुळे पर्यटकांना हवी तशी आनंदपर्वणी आणि नेत्रसुख मिळत असल्याने पर्यटक मंडळी आधी पन्हाळा आणि नंतर मसाई पठार असा दोन्ही पर्याय निवडताना दिसताहेत.
मसाई पठारवर फुलांमध्ये ड्रॉसेरा, सोनकी, तेरडा, निलीमा यांसारखी असंख्य प्रकारची फुले फुलली आहेत.
तसेच दुर्मिळ औषधी वनस्पती याही याठिकाणी पाहायला मिळत आहेत. मसाई पठार जांभ्या खडकापासून बनले असल्याने काळया खडकावर फुलणारी भुईआमरीच्या सहा ते सात प्रजाती इथे आढळतात.
रानकोथिंबीर, सफेद मुसळी, नीलवंती , मंजिरी, सीतेची आसवे, केना, पेनवा यासारख्या विविध रंगाची, आकाराची, छोटीमोठी रानफुलेही पाहायला मिळतात.
मसाई पठारावर तलावांच्या काठावर पाणथळ परिसरातही मोठ्या संख्येने फुले फुलतात.
निसर्गाची ही रंगीबेरंगी दुनिया अनुभवण्यासाठी कोल्हापूरचे हे प्रति कास पठार नव्हे तर 'खास' पठार पाहण्यासाठी पर्यटकाबरोबर निसर्ग अभ्यासकांची पावले ही पठाराकडे वळताहेत.