Ind vs Aus: सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियासाठी आतापर्यंत ही मालिका चढ-उतार अशी राहिली आहे, कारण पर्थमध्ये मोठा विजय मिळवला होता पण ॲडलेडमध्ये 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता.
पिंक बॉलने खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर दिसला आणि ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल या खेळाडूंनी तिसऱ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्यापूर्वी ॲडलेडमध्ये भरपूर नेट सराव केला.
गाबा येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीच्या स्थानावर मोठी चर्चा आहे. दुसऱ्या कसोटीतून संघात सामील झालेल्या रोहितने आपले सलामीचे स्थान सोडले आणि ॲडलेडमध्ये सहाव्या क्रमांकावर उतरला, ज्यामध्ये तो चांगलाच अडकल्याचे दिसून आले.
गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात रोहितने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली जेणेकरून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल ही सलामीची जोडी अबाधित राहिली.
राहुल-यशस्वी यांनी पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऐतिहासिक भागीदारी करून सलामीचे अनेक विक्रम मोडीत काढले होते. पण दुसऱ्या कसोटीत दोघेही धावा करू शकले नाहीत.
सराव सत्रात काय घडलं?- ॲडलेडमध्ये भारताच्या सराव सत्रादरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या फलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल झाल्याचे दिसून आले नाही. ॲडलेडमध्ये ज्या क्रमाने ते उतरले होते त्याच क्रमाने खेळाडू फलंदाजीच्या सरावासाठी आले होते.
केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रथम फटकेबाजी केली, त्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत. या फलंदाजीच्या क्रमाने रोहित गाब्बामध्येही मधल्या फळीत खेळणार असल्याचे सूचित होते, अशी चर्चा आहे.