IND vs AUS : DSP सिराज अन् बुम बुम बुमराहची कमाल, ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ 55 धावात माघारी पाठवला, भारताचा पलटवार

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 337 धावांवर आटोपला आहे. त्यांनी भारतावर 157 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये ट्रेविस हेडनं 140 धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं 4 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजनं देखील 4 विकेट घेतल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जसप्रीत बुमराहनं पहिल्या कसोटीप्रमाणं या कसोटीत देखील चांगली कामगिरी केली. त्यानं चार विकेट घेतल्या.

मोहम्मद सिराजनं ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रेविस हेडला 140 धावांवर बाद केलं. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळाली.
मोहम्मद सिराजनं एकूण 4 विकेट घेतल्या. तर, अश्विन यानं एक आणि नितीशकुमार रेड्डीनं एक विकेट घेतली.
भारताच्या गोलंदाजांनी आज 9 विकेट घेतल्या. तर, ट्रेविस हेडची 140 धावांची खेळी भारतासाठी डोकेदुखी ठरली. अखेर सिराजनं त्याला बाद केलं.ऑस्ट्रेलियानं शेवटच्या 5 विकेट 55 धावांमध्ये गमावल्या.