IND vs AUS : पर्थमध्ये इतिहास रचला, टीम इंडियानं 16 वर्षानंतर कसोटी जिंकली, भारताच्या विजयाचे पाच शिलेदार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी चौथ्या दिवशी संपली आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाला पर्थ कसोटीत 1-0 असं पराभूत केलं आहे. भारतानं 295 धावांनी कसोटी जिंकली आहे. जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. त्यानं दोन्ही डावात मिळून 8 विकेट घेतल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयशस्वी जयस्वाल पहिल्या डावात शु्न्यावर बाद झाला. तर, दुसऱ्या डावात त्यानं 161 धावा करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला.
केएल राहुल यानं दोन्ही डावात भारतीय संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली. केएल राहुलनं पहिल्या डावात 26 धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्यानं 77 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलनं पहिल्या विकेटसाठी दुसऱ्या डावात 201 धावांची भागिदारी केली.
विराट कोहली संघात असणं फार महत्त्वाचं आहे. ऑस्ट्रेलियात विराट नेहमी फॉर्ममध्ये असतो. विराटनं दुसऱ्या डावात 100 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाला मॅचमधून पूर्णपणे बाहेर ढकलण्यासाठी विराटची खेळी महत्त्वाची ठरली.
नितीश कुमार रेड्डीनं दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली. पहिल्या डावात नितीशकुमार रेड्डीनं 41 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात त्यानं नाबाद 38 धावा केल्या. याशिवाय नितीशकुमार रेड्डीनं मिशेल मार्शची विकेट घेतली.