Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसर ट्रॉफीसाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
नुकतेच घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून 3-0 ने पराभूत झाल्याने महत्त्वाच्या मालिकेपूर्वी भारतीय संघावर खूप दडपण आहे. ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी गौतम गंभीरने मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहलीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने भाष्य केलं होतं. विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात नाही, असं रिकी पाँटिंग म्हणाला होता.
रिकी पाँटिंगच्या या विधानावर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आक्रमक प्रतिक्रिया दिली होती.
रिकी पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध?, त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा, असं गौतम गंभीरने सांगितले. आता रिकी पाँटिंगनेही प्रत्युत्तर दिले आहे.
मी विराट कोहलीच्या कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली. माझा काहीच वाईट हेतू नव्हता, असं रिकी पाँटिंगने सांगितले.
गौतम गंभीरला मी ओळखतो. त्याचा स्वभावच मुळात आक्रमक आणि संतापी आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या या विधानामुळे मला काहीच आश्चर्य वाटले नाही. त्याच्याकडून हीच अपेक्षा, असं रिकी पाँटिंगने सांगितले. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी गौतम गंभीर आणि रिकी पाँटिंगनमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे.