Ind vs Aus BGT 2024-25 Fight : कोहली, सिराज ते बुमराहपर्यंत...ऑस्ट्रेलियात जाऊन नडले; हेड, कॉन्स्टासला भिडले, PHOTO
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली. ज्यामध्ये टीम इंडियाला या मालिकेत 3-1 असा पराभव पत्करावा लागला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मालिकेदरम्यान अनेक भारतीय स्टार्स मैदानावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी भिडले. चला तर मग बघूया या मालिकेत कोणत्या भारतीय खेळाडूंचा वाद ऑस्ट्रेलियन खेळाडूशी झाला.
सगळ्यात आधी ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटीदरम्यान मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात शाब्दिक वाद पाहायला मिळाला होता.
मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या सामन्यात विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाच्या सॅम कॉन्स्टास यांच्यात वाद झाला होता. कोहलीने कॉन्स्टासला धक्का मारला होता, त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या घटनेनंतर कोहलीला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या सॅम कॉन्स्टास भारताचा महान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी भिडला होता.
सिडनी कसोटीत विराट कोहलीने सँडपेपरच्या घटनेची नक्कल करून ऑस्ट्रेलियाच्या जखमेवरही मीठ चोळले. 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत सँडपेपरचा वापर करून चेंडू छेडछाड करण्याच्या प्रकरणात अडकला होता. त्यावेळी बॅनक्रॉफ्टकडे सँडपेपर सापडला होता. कोहलीने बॅनक्रॉफ्टची अगदी तशीच नक्कल केली.