ऑस्ट्रेलियाविरोधात असा पराक्रम करणारा ऋतुराज पहिलाच, विराट-रोहितलाही जमलं नाही
ऑस्ट्रेलियाकडून एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 223 धावांचे आव्हान मिळालेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 222 धावांचा डोंगर उभारला. ऋतुराज गायकवाड याने नाबाद 123 धावांची खेळी केली.
ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.
ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा ऋतुराज गायकवाड पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना यासारख्या दिग्गजांनाही ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 मध्ये शतक ठोकता आले नव्हते.
ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांनी 59 चेंडूत 141 धावांची अभेद्य भागिदारी केली. यामध्ये ऋतुराज गायकवाडचे योगदान 101 धावांचे होते. ऋतुराज याने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. तिलक वर्माने त्याला चांगली साथ दिली. तिलक वर्माने 24 चेंडूत 31 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाडने 57 चेंडूत 123 धावांची खेळी केली. यामध्ये सात षटकार आणि 13 चौकार लगावले. ऋतुराज गायकवाडने अखेरच्या षटकात तीन षटकार आणि दोन चौकार ठोकले. 20 व्या षटकात भारताने तीस धावा कुटल्या.