Uttarkashi Tunnel Rescue : 'भारत माता की जय', बोगद्यातून सुटका होताच कामगारांच्या घोषणा, 41 कामगारांची अखेर सुटका
उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका करण्यात आली. या बोगद्यात 41 कामगार अडकले होते, त्यांची 17 दिवसांनी सुटका करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबोगद्यात अडकलेल्या या कामगारांची सुटका झाली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकांचा ताफा आणि तात्पुरतं रुग्णालय सज्ज ठेवण्यात आलं आहे.
सुरुवातील दोन कामगारांना बाहेर काढण्यात आलं, नंतर सर्व कामगारांची सुटका करण्यात आली.
बोगद्याच्या बाहेर येताच कामगारांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.
गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं.
उत्तरकाशीतील (Uttarkashi) सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या होत्या.
तब्बल 17 दिवसांनी या 41 कामगारांना बाहेर काढण्यात आलं. सुरुवातीला दोन कामगांरांना बाहेर काढण्यात आलं आणि नंतर इतरांनाही बाहेर काढण्यात आलं.
बांधकामाच्या ठिकाणाहून मुख्य रुग्णालय हे 30 किमीच्या अंतरावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी बांधकामाच्या ठिकाणीच तात्पुरत्या रुग्णालयाची सोय करण्यात आली.