Kantara A Legend Chapter 1: कांताराची क्रेझ; फर्स्ट लूक टीझरला 24 तासात मिळाले एवढे व्ह्यूज
सप्टेंबर 2022 मध्ये 'कांतारा' (Kantara) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाची कथा, चित्रपटामधील सीन्स आणि चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय या सगळ्याच गोष्टींचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता कांतारा चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रीक्वलचे घोषणा केली आहे. या प्रीक्वेलचं नाव कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 (Kantara A Legend Chapter-1) असं आहे.
कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 (Kantara A Legend Chapter-1) या चित्रपटामधील ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) फर्स्ट लूक आणि लूक टीझर रिलीज झाला आहे.
कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाचा फर्स्ट लूक ऋषभ शेट्टीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो रक्ताने माखलेला दिसक आहे. त्याच्या एका हातात त्रिशुळ दिसत आहे.
Hombale Films या युट्यूब चॅनलवर कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचा टीझर देखील शेअर करण्यात आला आहे.
कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 (Kantara A Legend Chapter-1) च्या फर्स्ट लूक टीझरला 24 तासांत 12 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
कांतारा चित्रपटाप्रमाणेच आता कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
आता कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 हा चित्रपट कधी रिलीज होणार? तसेच या चित्रपटात आणखी कोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.