In Pics : पहिला दिवस भारताचा, जाडेजा-अश्विनची कमाल गोलंदाजी, मग कॅप्टन रोहितची मजबूत फलंदाजी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात हा पहिला कसोटी सामना सुरु असून पहिल्या दिवशीचा खेळ भारताच्या नावावर राहिला.
पहिल्या दिवशीच्या अखेरीस भारत 77 वर 1 बाद अशी असून भारत 100 धावांनी पिछाडीवर आहे.
सामन्यात आधी फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने 177 धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली यावेळी जाडेजानं 5 तर अश्विन 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला आल्यावर कॅप्टन रोहित आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी भागिदारी केली.
राहुल 20 धावा करुन बाद झाला. तर रोहित शर्मा नाबाद 56 आणि आर अश्विन नाबाद शून्य धावांवर क्रिजवर आहे.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावात करण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. पण भारतानं अप्रतिम गोलंदाजी करत हा डाव हाणून पाडला.
विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर मैदानात परतलेल्या जाडेजानं पाच विकेट्स घेत कमाल केली.
तसंच कॅप्टन रोहितनं अर्धशतक दिवसअखेरपर्यंत ठोकत एकप्रकारे दमदार पुनरागमन केलं आहे.