PHOTO : नांदेडमधील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय शेती!
नांदेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत आता सेंद्रिय शेतीचे धडे गिरवत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड जिल्ह्यातील धामदरी येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शाळेतून अभ्यासक्रमाबरोबर शेतीविषयक पायाभूत माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाते.
ज्यात शाळेच्या आवारात या विद्यार्थ्यांनी सांडपाण्यापासून परसबाग फुलवली आहे.
शाळेतील या परसबागेतून उगवलेल्या भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात उपयोग होत आहे.
दरम्यान ही परसबाग सांडपाण्याचा वापर करत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन फुलवली आहे.
विद्यार्थ्यांना सकस, ताज्या भाज्या त्वरित उपलब्ध व्हाव्यात, भाज्या लागवडीविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, सांडपाण्याचे व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातच शिक्षकांच्या मदतीने हा प्रयोग केला आहे.
अन्नकण असलेल्या या पाण्याचा योग्य विनियोग व्हावा यासाठी शिक्षकांना परसबागेची कल्पना सुचली.
विद्यार्थ्यांनी टोमॅटो, वांगी, कोबी, कांदे, पालक, कोथिंबीर, मेथीची लागवड करुन परसबाग तयार केली आहे.
मशागतीपासून लागवड, निगा, काढणीपर्यंतच्या प्रक्रिया विद्यार्थी स्वतः करत आहेत.
मुख्याध्यापक बळीराम शिंदे, शिक्षक राम पतंगे, रवींद्र जांभळे, धम्मदीप जोंधळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत आहे.