IND vs AUS 1st Innings Highlights: भारतीय फलंदाजांची खेळी, भारताचं कांगारुंना 241 धावांचं आव्हान
विराट कोहलीने 54 तर राहुलने 66 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने तीन तर हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदीज करण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत भारताला एकापाठोपाठ एक धक्के दिले. रोहित शर्माने वादळी सुरुवात करुन दिली, पण त्यानेही विकेट फेकली.
शुभमन गिल याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात केली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
विराट कोहली आणि केएल राहुल यांनी 109 चेंडूत 67 धावांची भागिदारी केली. भारताच्या डावातील ही सर्वात मोठी भागिदारी होय.
विराट कोहली बाद झाल्यानंतर राहुलने जाडेजाच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विराट कोहलीने 63 चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.
केएल राहुलने 107 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने संयमी 66 धावा केल्या. रविंद्र जाडेजा याने 22 चेंडूत 9 धावांचे योगदान दिले. मोहम्मद शामी याने 10 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 6 धावा केल्या.
कुलदीप यादव आणि सूर्यकुमरा यादव यांनी अखेरीस किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार यादवने विकेट फेकली.
अखेरीस मोहम्मद सिराज याने 8 चेंडूत 9 धावांची खेळी केली. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. कुलदीप यादव याने 18 चेंडूत 10 धावांचे योगदान दिले.