Surya Grahan 2024 : पितृपक्षात 'या' 4 राशींवर असणार सूर्यग्रहणाचं सावट; कोणताही निर्णय घेताना राहा सावध
2 ऑक्टोबर रोजी लागणाऱ्या सूर्यग्रहणाचा काही राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. या दरम्यान नेमक्या कोणत्या राशींनी सावध राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेष राशीच्या लोकांसाठी वर्षातलं हे सूर्य ग्रहण अशुभ साध्य होणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमची नोकरी देखील जाऊ शकते.
सूर्य ग्रहणाचा अशुभ प्रभाव मिथुन राशीच्या लोकांवर पाहायला मिळणार आहे. या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, गुंतवणूक अजिबात करु नका. या काळात धनहानी होण्याची शक्यता आहे.
सूर्य ग्रहणाच्या दुष्प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात तणाव जाणवेल. तसेच, तुमची आर्थिकच नाही तर मानसिक शांतताही तुम्ही गमावून बसाल. त्यामुळे डोळे बंद करुन कोणावरही विश्वास ठेवू नका.
मीन राशीच्या लोकांना सूर्य ग्रहणाचा नाकारात्मक परिणाम सोसावा लागू शकतो. या काळात वैवाहिक नात्यात तणाव जाणवेल. पैशांची देवाण-घेवाण करु नका.
वर्षातल्या दुसऱ्या सूर्य ग्रहणाचा ज्या राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे या सर्व राशीच्या लोकांनी ग्रहण काळात भगवान शंकराच्या मंत्राचा जप करावा.
तसेच, सकारात्मक विचार करावा. त्याचबरोबर, नियमित सूर्यदेवाची पूजा करावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)