Maharashtra Elections 2024: प्रिया दत्त आशिष शेलारांचा खेळ बिघडवणार? विधानसभेत चुरस रंगणार, कोणाचं पारडं जड?
महाराष्ट्रात यंदा विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक होणार आहे. राज्यातील तीनही आघाडीचे पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शरद पवार यांची महाविकास आघाडी विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावाही करत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मुंबईत सहापैकी चार जागा जिंकून महायुतीला मोठा धक्का दिला होता.
दरम्यान, आणखी एका बातमीनं सर्वांनाच धक्का बसला आहे. काँग्रेस माजी खासदार प्रिया दत्त यांना वांद्रे पश्चिममधून उमेदवारी देऊ शकते. वांद्रे पश्चिमचे विद्यमान आमदार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आहेत, त्यांच्याविरोधात काँग्रेस प्रिया दत्त यांना उमेदवारी देऊ शकते.
प्रिया दत्त या वांद्रे पश्चिम विभागाच्या माजी खासदार राहिल्या असून या जागेवर त्यांचा बराच प्रभाव असल्याचं मानलं जातं. गेल्या काही महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत या जागेवरून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या. गायकवाड यांना 69 हजारांहून अधिक मतं मिळाली. त्यामुळेच या मतदारसंघात काँग्रेसच्या विजयाची शक्यता अधिकच वाढली आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील कल पाहता काँग्रेस खासदार प्रिया दत्त मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना तगडी टक्कर देऊ शकतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीमध्ये 70 टक्के जागांबाबत बोलणी झाली आहेत.
दरम्यान, यापैकी काही सीट आहेत, ज्याबाबत अद्याप निर्णय होणं बाकी आहे, त्यासंदर्भात 30 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या तीन पक्षांमध्ये बैठक होणार आहे.
जागांच्या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली असून, त्यापैकी 100 जागांवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट), 100 जागांवर काँग्रेस आणि 84 जागांवर शरद पवार यांचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित चार जागा इतर पक्षांना देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जीशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. सिद्दीकी यांनी सध्या काँग्रेस सोडली आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा निवडणुकीच्या मैदानात पराभव केला होता. दरम्यान, आता शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे शिवसेना वांद्रे पूर्वची जागा आपल्याकडे घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल.
महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे.