Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवचं टी20 क्रिकेटचा बॉस, आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कायम, बाबर कितव्या स्थानी?
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी 20 वर्ल्ड कप सुरु असताना आयसीसीनं रँकिंग जाहीर केलं आहे. भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याला टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरीचा फायदा होताना दिसत आहे. बाबर आझमला एका स्थानाचा फायदा झाला असून तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर, ट्रेविस हेडनं टॉप-10 मध्ये स्थान मिळवलं आहे.
अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनं ऑलराऊंडरच्या यादीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यानं शाकिब उल हसनला पिछाडीवर टाकलंय.
इंग्लंडचा स्पिनर आदिल रशीद टी20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा दुसऱ्या स्थानावर तर अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान तिसऱ्या स्थानावर आहे.