Lok Sabha Election Result : कुणी केंद्रातील आणि कुणी राज्यातील मंत्र्याचा पराभव केला, महाराष्ट्रातले सात आमदार बनले खासदार, दिल्ली गाजवण्याची संधी
प्रतिभा धानोरकर यांनी देखील महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यांना 718410 मतं मिळाली. धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्यावर 260406 मतांनी विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस नेत्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं. वर्षा गायकवाड यांनी 445545 मतं मिळवली. तर, वर्षा गायकवाड यांनी 16514 मतांनी उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं.
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले. त्यांनी विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पराभूत केलं. बळवंत वानखेडे यांना 526271 मतं मिळाली. त्यांनी 19731 मतांनी विजय मिळवला. ते दर्यापूरचे आमदार आहेत.
मुंबई पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची झाली. आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली. रवींद्र वायकर यांना 452644 मतं मिळाली, त्यांनी 48 मतांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला.
प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव केला. प्रणिती शिंदे यांना 620225 मतं मिळाली. तर, प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंचा 74197 मतांनी पराभव केला.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील मंत्री संदिपान भुमरे यांनी इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांचा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. भुमरे यांना 476130 मतं मिळाली. भुमरे यांनी इम्तियाज जलील यांच्यापेक्षा 134650 अधिक मतं मिळवली.
निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी अहमदनगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे यांचा पराभव केला.