वणव्यामध्ये गारवा! रणजीत मुंबईचा पराभव, पण 'मुंबईकर' रोहितला मात्र मिळाली गुड न्यूज
सध्या रणजी करंडक स्पर्धेचे सामने चालू आहेत. याच स्पर्धेत जम्मू काश्मीरच्या संघाने मुंबईच्या संघाचा पाच गडी राखून दणदणीत पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्मादेखील मुंबई संघाचा भाग आहे. रोहित, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे यासारखे बडे खेळाडू असूनही मुंबईचा पराभव झाला आहे.
याच कारणामुळे रोहित शर्मासह मुंबई संघाच्या सर्वाच चाहत्यांना हादरा बसला आहे. रोहित शर्मा असलेल्या संघात मुंबईला हादरा बसला असला तरी खुद्द रोहितला मात्र गुड न्यूज मिळाली आहे.
आयसीसीकडून सध्या 'आयसीसी अवॉर्ड्स 2024' दिले जात आहे. वेगवेगळ्या श्रेणीत चांगली कामगिरी करणाऱ्या सर्व देशांतील खेळाडूंचा या अवॉर्ड्सच्या माध्यमातून सन्मान केला जात आहे.
याच अवॉर्ड्स अंतर्गत आयसीसीने आयसीसी मेन्स टी-20 टीम ऑफ दी इयर 2024 अंतर्गत सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा एक संघ जाहीर केला आहे. या संघाच्या कर्णधारपदाचा सन्मान रोहित शर्माला मिळालाय.
त्यामुळे रणजी स्पर्धेत रोहित शर्मा खेळत असलेल्या मुंबई संघाचा पराभव झालेला असला तरी दुसरीकडे आयसीसीने त्याला दिलेल्या या बहुमानामुळे त्याचे चाहते सुखावले आहेत.
आयसीसीने जाहीर केलेल्या टीममध्ये रोहित शर्मा (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, फिल साल्ट, बाबर आझम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, हार्दिक पंड्या, रशीद खान, वानिन्दु हसरंगा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग हे खेळाडू आहेत. यात 11 पैकी चार भारतीय खेळाडू आहेत. या संपूर्ण टीमच्या कर्णधारपदाचा मान रोहित शर्माला मिळाला आहे.