IPO Update : पैसे तयार ठेवा,आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
डॉ. अग्रवाल हेल्थकेअर या कंपनीचा आयपीओ 29 जानेवारीला गुंतवणुकीसाठी खुला होईल. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 35 शेअर असतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीनं आयपीओचा किंमतपट्टा 382 ते 402 रुपयांमध्ये निश्चित केला आहे. यानुसार रिटेल गुंतवणूकदाराला एका लॉटवर बोली लावायची असल्यास किमान 14070 रुपयांची बोली लावावी लागेल.
डॉ. अग्रवाल हेल्थकेअर आयपीओ 3027 .26 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला जाईल. या आयपीओद्वारे ऑफर फॉर सेलद्वारे काही शेअरची विक्री होईल. तर काही शेअर नव्यानं जारी केले जातील.
कंपनी 75 लाख शेअर नव्यानं जारी करेल. तर, ऑफर फॉर सेलद्वारे 6.78 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करेल. 3 फेब्रुवारीला शेअर अलॉट केले जातील. तर, बीएसई आणि एनएसईवर 5 फेब्रुवारीला लिस्टिंग होईल.
आयपीओमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. इन्वेस्टर्स गेननुसार आयपीओचा जीएमपी 60 रुपयांवर पोहोचला आहे. डीआरएचपीनुसार 195 कोटींचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी, तर इतर रकमेचा वापर कंपनीच्या विकासासठी केला जाईल.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)