मालाडमध्ये अग्नितांडव! फर्निचर मार्केट जळून खाक, पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या मालाडमध्ये (Malad News) शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालाड-दिंडोशी (Dindoshi News) दरम्यान असणाऱ्या खडकपाडा परिसरात असणाऱ्या फर्निचरच्या गोदामांमध्ये ही आग लागली आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी एका गोदामात लागलेली ही आग आजुबाजूला पसरत गेली आणि आता या आगीने भीषण स्वरुप धारण केले आहे.
ही आग वेगाने पसरत असून त्यामुळे आकाशात काळ्या धुराचा प्रचंड लोट उठल्याचे पाहायला मिळत आहे. धुराचे हे लोट लांबच्या अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहेत. यावरुन या आगीची तीव्रता लक्षात येऊ शकते.
सकाळी 11 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची वर्दी मिळताच अग्मिशमन दलाच्या (Fire brigade) घटनास्थळी 15 ते 16 गाड्या अग्निशमन दलाचा पोहचली आहे,
सध्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागलेल्या भागात आजुबाजूला मोठ्याप्रमाणावर झोपडपट्टी आणि फर्निचरची दुकाने असल्याने ही आग आणखी पसरण्याचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या दिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून सुरक्षेच्या कारणास्तव आजुबाजूचा परिसर खाली केला जात आहे.
या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, 13 ते 14 फर्निचर चे दुकान जळून खाक, झाल्याने मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे.
आग अजूनही मोठ्या प्रमाणात सुरू आहे,सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
आजीवन नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आग वेगाने पसरु लागल्यानंतर या परिसरातील रहिवाशांची पळापळ सुरु झाली. या परिसरातील एका हॉटेलजवळ गॅस सिलिंडर असलेल्या काही गाड्या उभ्या होत्या.
या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यास स्फोटांची मालिका सुरु होऊ शकते. त्यासाठी पोलिसांकडून सिलेंडरच्या या गाड्या हटवण्यासाठी धावपळ सुरु आहे. या भागात रांगेत फर्निचरची अनेक दुकाने आहेत.
आगीने भीषण स्वरुप धारण केल्यानंतर या दुकानांना आगीची झळ जाणवू लागली. आगीच्या धगीने अनेक दुकानांमधील काचा तडकायला सुरुवात झाली आहे.
सुदैवाने या आगीत जीवित हानी नाही,
त्यामुळे येथील व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमधील साहित्य इतर ठिकाणी हलवायला सुरुवात केली आहे.
सध्या खडकपाडा परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याठिकाणी रस्त्यावर नागरिकांची गर्दी जमली आहे.