Mumbai Indians Win 2nd WPL Title : मुंबई इंडियन्स जिंकल्यावर हरमनचे डोळे पाण्याने भरुन गेले, खेळाडूंनी नीता अंबानींना मारली मिठी अन्...
नॅट सिव्हर ब्रंटच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरी जिंकून विजेता ठरला आहे.
यापूर्वी, मुंबईने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीत दिल्लीला हरवून विजेतेपद पटकावले होते.
या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीणी नीता अंबानी यांनी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नॅट सिव्हर ब्रंट यांचे कौतुक केले.
नीता अंबानी म्हणाल्या की, हरमनप्रीत कौर आणि नॅट सिव्हर ब्रंट यांनी जेतेपदाच्या सामन्यात ज्या प्रकारचा खेळल्या ते कौतुकास्पद होते.
मुंबई इंडियन्स जिंकल्यावर खेळाडूंनी नीता अंबानींना मिठी मारली, त्यावेळी हरमनच्या डोळे पाण्याने भरुन आले होते.
या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर मुंबईने 20 षटकांत सात गडी गमावून 149 धावा केल्या.
प्रत्युत्तरात दिल्लीला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ 141 धावा करता आल्या.
अशाप्रकारे मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.