Nirmala Nawale : कारेगावच्या सरपंच मॅडमना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, अपात्रतेसंदर्भातील याचिका फेटाळली
Nirmala Nawale, Mumbai : कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळालाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई उच्च न्यायालयाने सरपंच नवले यांना पात्र ठरवले असून माजी सरपंच अनिल नवले यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.
नवले यांची 2021 मध्ये कारेगावच्या सरपंचपदी निवड झाली होती.
दरम्यान, सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण असल्याने त्यांना अपात्र करावे, अशी तक्रार माजी सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र केले होते.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात निर्मला नवले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिलाय.
अपात्रेसंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर निर्मला नवले म्हणाल्या, सत्याचा विजय होतो.
मला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सहकार्य लाभले.