Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हार्दिक पांड्याला गंभीर दुखापत, टीम इंडिया टेन्शनमध्ये, पाहा Exclusive Photos
गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे. त्याचे फोटो समोर आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्कॅनिंग केल्यानंतर त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबतची माहिती समोर येणार आहे. बीबीसीआयने हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत सोशल मीडियावर माहिती दिली.
हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हार्दिक पांड्यामुळे टीम इंडिया संतुलीत होत होती. हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत मोलाचं योगदान देतो. अशात त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची अडचण वाढणार आहे.
हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाच्या आणि चाहत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुखापत झाल्यामुळे हार्दिक पांड्याला मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्या आज मैदानात पुन्हा दिसणार नाही. हार्दिक पांड्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
तिथे हार्दिक पांड्याच्या पायाचे स्कॅन करण्यात येणार आहे. हार्दिक पांड्या पुढील सामन्याआधी तंदुरुस्त होणार का? हा प्रश्नही चाहत्यांना सतावत आहे.
आठ षटकांपर्यंत जसप्रीत बुमारह आणि मोहम्मद सिराज यांनी बांगलादेशच्या सलामी फलंदाजांना हात उघडून दिले नव्हते. नववे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला. पहिला चेंडू निर्धाव फेकला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार गेला. तिसरा चेंडू फेकल्यानंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाली.
हार्दिक पांड्या चेंडू अडवण्यासाठी गेला, पण त्याचवेळी त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. फिजिओ तात्काळ मैदानात आले. त्यांनी उपचार केले. हार्दिक पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी गेला. पण त्याची वेदना वाढली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
हार्दिक पांड्याने पुन्हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण वेदना होत असल्यामुळे मैदान सोडावे लागले.
फोटो पाहिल्यानंतर हार्दिक पांड्याला खूप त्रास होत असल्याचे दिसत आहे. हार्दिक पांड्या फलंदाजीला येणार की नाही.. याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळाली नाही.