Mumbai Air Pollution: मास्क वापरण्याबाबत BMC चं स्पष्टीकरण!
मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही (Mumbai Air Pollution) खराब स्थितीत पोहचली आहे. ठाणे, नवी मुंबईतील हवाही खराब आहे. (PHOTO CREDIT: UNPLASH)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविलेपार्ले, चकाला परिसरातील हवेची स्थिती बुधवारी सायंकाळी अतिधोकादायक असल्याची नोंद झाली आहे. यानंतर मास्क सक्तीने वापरण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.(PHOTO CREDIT: UNPLASH)
त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मास्क वापरण्याबाबत कोणतंही आवाहन नाही, मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. (PHOTO CREDIT: UNPLASH)
वातावरण बदलांमुळे बृहन्मुंबईसह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरित परिणाम आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे वृत्त प्रकाशित झाले आहे.(PHOTO CREDIT: UNPLASH)
मात्र या बातम्यांमध्ये तथ्य नसूनमास्क वापरण्याबाबत कोणतंही आवाहन महानगरपालिकेने केलेले नाही, असे परिपत्रक काढत स्पष्ट करण्यात आले आहे. (PHOTO CREDIT: UNPLASH)
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, हवेची गुणवत्ता विपरित होत असल्याचे आढळल्यानंतर याअनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजनांविषयी कार्यवाही विचाराधीन आहे.(PHOTO CREDIT: UNPLASH)
मुंबई शहरात धुळीकणांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. आता महापालिकेकडून हे रोखण्यासाठी अँटी स्मोग गन लावण्यात येणार असून त्यामुळे प्रदूषण टाळता येणार आहे.(PHOTO CREDIT: UNPLASH)
त्यामुळे समाज माध्यमांमधून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख करुन प्रकाशित किंवा प्रसारित केलेले वृत्त निराधार व अयोग्य आहे. (PHOTO CREDIT: UNPLASH)
हवामान आणि तत्संबंधीत सर्व यंत्रणांशी बृहन्मुंबई महानगरपालिका समन्वय साधत असून त्यांच्याकडून प्राप्त निर्देशांनुसार यथोचित उपाययोजना, निर्णय, आदींची माहिती नागरिकांपर्यंत वेळोवेळी पोहोचविण्यात येईल, असे नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (PHOTO CREDIT: UNPLASH)