हार्दिक पांड्याचं गुजरातमध्ये जोरदार स्वागत; चाहत्यांचा महापूर, गर्दी किती?, पाहा Photo
भारतानं (Team India) टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024) अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विश्वविजेतेपद मिळवलं. भारताच्या या विजयामध्ये हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) योगदान महत्त्वाचं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App15 जून रोजी हार्दिक पांड्या वडोदरा या त्याच्या मूळ शहरात दाखल झाला. हार्दिक पांड्यांच्या स्वागतला जनसागर लोटला आहे.
वडोदरा शहरामधील रस्त्यावर मोठा जनसमुदाय जमलेला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे भारतीय क्रिकेट टीमची नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून विजयी परेड काढण्यात आली होती. त्याप्रकारे वडोदरा शहरात ओपन बसमधून हार्दिक पांड्याची विजयी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.
हार्दिक पांड्यानं तिरंगा हाती घेत स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केलं.
हार्दिक पांड्याचा रोड शो मांडवी पासून सुरु होऊन लहरीपुरा, सूरसागर आणि दांडिया बाजारातून पुढे नवलखी कम्पाऊंडमध्ये संपणार आहे.
हार्दिक टीम इंडियाच्या जर्सीसह मिरवणुकीत सहभागी झाला होता. हार्दिकच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या बसवर वडोदराचा गौरव असं लिहिलं होतं.
हार्दिकच्या स्वागतसाठी जमलेल्या जनसमुदायाच्या हातात देखील तिरंगा झेंडा पाहायला मिळाला.
हार्दिक पांड्याच्या रोडशो साठी स्थानिक पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी वंदे मातरम गाणं देखील वाजवण्यात आलं.
हार्दिक पांड्या ओपन बसमधून चाहत्यांकडून करण्यात येणाऱ्या अभिनंदनाचा स्वीकार करताना पाहायला मिळाला.
काही वेळानंतर हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या देखील यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या रोडशोच लाईव्ह स्ट्रीमिंग देखील करण्यात आलं आहे.