होम थिएटरपासून गेमिंग झोनपर्यंत, असा आहे हार्दिकचा आलिशन 8 BHK फ्लॅट
Hardik Pandya House: हार्दिक आपल्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध आहे. पांड्या ब्रदर्सने अल्पवधीतच आपलं नाव कमावले. त्यांच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाहूयात हार्दिक पांड्याचं आलिशान घर...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहार्दिक पांड्या क्रिकेटसह आपल्या लग्जरी लाईफमुळेही चर्चेत असतो. हार्दिक आपल्या कुटुंबासह मुंबईत 8 बीएचके आलिशान फ्लॅटमध्ये राहतो..हा फ्लॅट 3838 स्केअरफूट इतका आहे.
हार्दिक पांड्याचा फ्लॅट रुस्तमजी पॅरामाउंट येथे आहे. या सोसायटीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सितारे राहतात.
हे हार्दिक पांड्याचे बेडरूम आहे. ब्लू थीमवर आधारित डिझाइन करण्यात आले आहे.
हार्दिकने घराला सजवण्यासाठी महागड्या इंटीरिअरचा वापर केलाय. हार्दिकने घरातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
त्याशिवाय हार्दिकच्या घरात गेमिंग झोनही आहे... तसेच प्रायव्हेट स्विमिंग पूलही आहे.
हार्दिक पांड्या फावल्या वेळेत चित्रपट पाहण्याचं वेड आहे. त्यामुळे पांड्या ब्रदर्सने घरात थिएटर तयार केलेय.
हार्दिक आणि नताशा 14 फेब्रुवारी रोजी उदयपुरमध्ये पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. लव्ह बर्ड उदयपुरमध्ये पोहचलेय.