Hardik Pandya : आम्हाला कठीण अन् संवदेनशील प्रसंगी समजून घ्याल, हार्दिक पांड्या अन् नताशा स्टॅनकोविकची विनंती
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांनी विभक्त होत असल्याची घोषणा केली. दोघांमधील घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे.हार्दिकनं 31 मे 2020 रोजी नताशा सोबत लग्न केले होते.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकनं 30 जुलै 2020 रोजी अगस्त्य नावाच्या मुलाला जन्म दिला. हार्दिक पांड्या आणि नताशानं 14 फेब्रुवारी 2023 दुसऱ्यांदा पुन्हा लग्न केलं होतं.
गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकमध्ये बिनसल्याच्या चर्चा सुरु होत्या. दोघांनी देखील या प्रकरणावर अधिकृत भाष्य केलं नव्हतं. अखेर काल दोघांनी देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन विभक्त होत असल्याची घोषणा केली.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकनं विभक्त होत असताना लिहिलेल्या पोस्टमध्ये चाहत्यांना एक आवाहन केलं आहे. तुम्ही आम्हाला या कठीण प्रसंगी पाठिंबा द्याल, अशी आशा हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकनं केली आहे. या कठीण आणि संवेदनशील अशा प्रसंगी आम्हाला प्रायव्हसी मिळावी, सर्वांनी समजून घ्यावं, असं आवाहन हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी केलं आहे.