Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते बॅनर अन् मंडप सगळंच गुलाबी, अजितदादांची नेमकी स्ट्रॅटेजी काय?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता महिला मतदार लक्षात घेत आपल्या पक्षाची जाहीरात, ग्राफिक्स यामधे गुलाबी रंगाचा वापर वाढवल्याचं पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइतकचं काय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या दैनंदिन वापरातील कपड्यात गुलाबी रंगाची छटा असणारे जॅकेट वापरण्यास सुरूवात केली आहे.
संपूर्ण अधिवेशन कालावधीतदेखील अशाच प्रकारचा त्यांचा पेहराव महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळाला.
सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्याने नेमलेल्या नरेश अरोरा यांच्या टीमने कँपेनिंगचा भाग म्हणून अशा प्रकारचा पेहराव करण्यास सांगितलं आहे.
अजित पवार यांचा चेहरा सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकणारा असावा यासाठीच सिद्धीविनायक दर्शनासाठी सर्व आमदारांना घेऊन जाण्याचा प्लॅन देखील आयोजित करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे नुकतीच बारामतीमध्ये जी सभा पार पडली या सभेतदेखील अशाच प्रकारे अजित पवार यांचा चेहरा पोट्रेट करण्यासाठी गुलाबी रंगाचा वापर असणारे अनेक बॅनर केवळ अजित पवार यांच्या फोटोसह लावण्यात आल्याचं पाहायलाला मिळाले.
सर्व पोस्टरवर अजित पवार यांच्याशिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर कोणत्याही नेत्याचा फोटो वापरण्यात आला नव्हता.
नरेश अरोरा यांची डिजाईन बॉक्स ही कंपनी असून या कंपनीने या आधी कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार यांच्यासाठी काम केलं होतं. त्यानंतर अशोक गेहलोत यांच्यासाठी राजस्थानमध्ये काम केलं होतं. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही कंपनी काम करत आहे.