Hardik Pandya : 'ऑल इज वेल', हार्दिक पांड्या मोठ्या भावाच्या भूमिकेत,सूर्यकुमारचं अनोखं अभिनंदन, सर्वांची मनं जिंकली
भारताचा टी 20 संघ श्रींलका दौऱ्यावर रवाना झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करणार आहे. सूर्यकुमार यादव अन् हार्दिक पांड्या या दोघांची नावं कर्णधारपदाच्या शर्यतीत होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवड समिती आणि मुख्य प्रशिक्षकांनी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या दोघांपैकी सूर्याला कर्णधार म्हणून संधी दिली. टी 20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिकनं उपकर्णधारपद भूषवलं होतं.
हार्दिक पांड्याचं नाव कॅप्टनपदाच्या शर्यतीत असून देखील ऐनवेळी सूर्यकुमार यादवला नेतृत्त्वाची संधी देण्यात आली. यानंतर सोशल मीडियात तर्क वितर्क सुरु झाले होते. त्या सर्व चर्चांना हार्दिकनं अनोख्या पद्धतीनं पूर्णविराम दिला.
कोणत्याही चर्चांना वाव मिळू नये म्हणून हार्दिकनं पांड्यानं श्रीलंका दौऱ्यावर जाताना विमानतळावर सूर्यकुमार यादवची पहिल्यांदा भेट होताच त्याला मिठी मारत मोठ्या प्रमाण शुभेच्छा दिल्या.
बीसीसीआयनं या संदर्भातील व्हिडीओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. हार्दिक पांड्या त्यामध्ये सूर्यकुमार यादवला मिठी मारताना पाहायला मिळाला. हा सर्व प्रसंग कोलंबोला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर घडला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिका 27 जुलैपासून सुरु होणार आहे.