Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Budget 2024 : 2019 ते 2024 अर्थसंकल्पाबरोबरच अर्थमंत्र्यांच्या साड्यांचीही चर्चा; पाहा फोटो
निर्मला सीतारामन सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी त्यांनी सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान त्यांनी केलेल्या घोषणांसोबतच त्यांनी परिधान केलेल्या साड्यांचीही वेळोवेळी चर्चा झालेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी पहिला बजेट सादर करताना गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. गुलाबी रंग हा स्थिरता आणि गंभीरतेचं प्रतीक मानला जातो.
2020 नंतर निर्मला सीतारामन यांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. पिवळा रंग हा उत्साह आणि ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. त्यांच्या या लूकचं देखील भरभरून कौतुक झालं होतं. हे बजेट 2 तास 42 मिनिटं चाललं.
2021 चं बजेट हे कोरोना काळात सादर करण्यात आलं. या काळात देशात महामारीचं सावटच उभं राहिलं होतं. या दरम्यान निर्मला सीतारामन यांनी लाल बॉर्डर रंगाची ऑफ व्हाईट साडी परिधान केली होती.
2022 मध्ये निर्मला सीतारामन यांनी कॉफी रंगाची साडी परिधान केली होती. ओडिशाची पारंपरिक संस्कृती यातून दिसत होती.
2023 चा बजेट सादर करण्यासाठी निर्मला सीतारामन यांनी पारंपरिक लाल रंगाची साडी परिधान केली होती. लाल रंग हा प्रेम, प्रतिबद्धता, ताकद आणि बहादुरीचं प्रतीक मानला जातो.
2024 च्या अंतरिम बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी निळ्या रंगाची हॅंडलूम साडी परिधान केली होती. ही साडी टसर सिल्कची होती.
आज देशाचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन या ऑफ व्हाईट आणि मजेंडा कलरची बॉर्डर असलेली साडी परिधान केली आहे.दरम्यान, देशाच्या अर्थसंकल्पावरदेखील सर्वांचंच लक्ष आहे.