Union Budget 2024-25 : केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर, काय स्वस्त, काय महाग?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024-25) सादर केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. कारण लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली.
वसतिगृह बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून हे सुलभ केले जाईल.
सोनं, चांदी स्वस्त होणार, मोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार, कॅन्सरवरची औषधे, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत, लिथियम बॅटरी, इलेक्ट्रीक वाहने, सोलार सेट, चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू, पीवीसी फ्लेक्स बॅनर आणि विजेची तार स्वत होणार.
प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणार आणि प्लास्टीक उत्पादने महाग होणार.
निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या सरकारी योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे.
यापूर्वी या योजनेअंतर्गत एमएसएमईंना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिलं जात होतं, ते आता 20 लाख रुपये करण्यात आलं आहे.