In Pics | हरभजन- गीता बसराच्या नात्यात दुसऱ्यांदा Good News
क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि त्याची पत्नी, गीता बसरा जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या वळणावर पोहोचले असून, आता ते या कुटुंबात एका नव्या सदस्याचं स्वागत करण्यात सज्ज झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगीता बसरानंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची माहिती दिली.
गीतानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
फक्त गीताच नव्हे, हरभजन सिंह आणि त्यांची मुलगी हिनाया हिसुद्धा येणाऱ्या नव्या भावंडासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर या सेलिब्रिटीने हे फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनीच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. ज्यामध्ये सुरेश रैनाच्या पत्नीनंही या जोडीने गीता आणि हरभजनला शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं.
गीता आणि हरभजन त्यांच्या बाळाचं स्वागत जुलै महिन्यात करणार आहेत. तोवर ही जोडी दुसऱ्यांदा या आनंदपर्वातून जीवनाच्या एका नव्या प्रवासाचा अनुभव घेणार आहे. (सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)