In Pics : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण
Bollywood_Corona
1/7
कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने होत आहे. दरम्यान, मुंबईत वास्तव्य करणारे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये वरुण धवन, कृती सेनॉन, सिद्धांत चतुर्वेदी, रणवीर कपूर आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचा समावेश आहे.
2/7
अलीकडेच बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्याच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये असून लवकरच बरा होईल.
3/7
प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्यांने स्वत: ला आयसोलेट केले आहे.
4/7
प्रसिद्ध अभिनेत्री तारा सुतारिया हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तारा लवकरच ‘तडाप’ चित्रपटात दिसणार आहे.
5/7
image 5बॉलिवूडची अभिनेत्री कृती सेनॉनलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
6/7
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनलाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र आता त्याला बरे वाटू लागले आहे.
7/7
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. ते देखील यातून रिकव्हर होत आहेत.
Published at : 14 Mar 2021 10:25 AM (IST)