Gautam Gambhir : गौतम गंभीरच्या मनासारखे झाले तर... 'हा' पठ्ठ्या होणार टीम इंडियाचा कर्णधार!
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयने गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. सुरुवातीला त्याच्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ ठेवल्यानंतर, त्याने हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवला टी-20 कर्णधार म्हणून नियुक्त केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. कारण सूर्या कर्णधारपदाच्या शर्यतीत कुठेही नव्हता. आता कसोटी क्रिकेटमध्येही असेच काहीसे घडू शकते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेत भारतीय संघाचा 3-1 असा पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने आढावा बैठक बोलावली होती.
या बैठकीला प्रशिक्षक गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रोहितच्या कर्णधारपदाचीही चर्चा झाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित म्हणतो की, जेव्हा तो कर्णधारपद सोडेल तेव्हा बोर्ड ज्याला कर्णधार बनवेल त्याला तो पूर्ण पाठिंबा देईल.
पुढील कसोटी कर्णधार म्हणून गिल आणि पंत यांच्या नावांची चर्चा होती, परंतु गंभीरला या दोघांऐवजी यशस्वी जैस्वालला पुढील कसोटी कर्णधार बनवायचे आहे.
गौतम गंभीर मुख्य कोच बनल्यापासून आतापर्यंत तो बीसीसीआयला त्याचा मुद्दा मान्य करण्यात यशस्वी झाला आहेत. जर तो यावेळीही यशस्वी झाला तर वयाच्या 23 व्या वर्षी यशस्वी जैस्वाल भारताचा पुढचा कसोटी कर्णधार बनू शकतो.
जरी जैस्वालला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा पूर्वीचा अनुभव नसला तरी, त्याचा फॉर्म त्याच्या बाजूने जाऊ शकतो.