'गौतम गंभीर जास्त दिवस प्रशिक्षकपदावर टिकणार नाही...', भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या खेळाडूचं मोठं विधान
टीम इंडियाचा श्रीलंका दौरा गौतम गंभीरसाठी खूप महत्त्वाचा होता, कारण त्याने या दौऱ्यापासून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. (Image Credit-BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली असली तरी वनडे मालिकेची सुरुवात चांगली झालेली नाही. (Image Credit-BCCI)
रविवारी झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान श्रीलंकेने भारतीय संघाचा 32 धावांनी पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (Image Credit-ICC)
गंभीरचा मार्गदर्शक म्हणून उत्कृष्ट रेकॉर्ड आहे, ज्यामुळे लखनौ सुपर जायंट्सला दोन्ही हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचण्यास मदत झाली. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सचे तिसरे आयपीएल विजेतेपद मिळवले.(Image Credit-Social Media)
गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून फार काळ टिकू शकणार नाही, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा यांनी व्यक्त केले. (Image Credit-Social Media)
भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा गंभीरने राहुल द्रविडच्या जागी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. (Image Credit-Social Media)
शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना जोगिंदर शर्मा गंभीरबद्दल म्हणाला की, गौतम गंभीर संघाची धुरा सांभाळणार आहे, पण गौतम गंभीर जास्त काळ टिकू शकणार नाही, असं मला वाटतं.(Image Credit-Social Media)
गौतम गंभीरचे स्वतःचे काही निर्णय असतात. एखाद्या खेळाडूसोबत मतभेद होण्याची शक्यता असते. गौतम गंभीरच्या निर्णय सहसा असे असतात की इतरांना ते आवडत नाहीत.(Image Credit-Social Media)