Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Actress : शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारलीय 'या' अभिनेत्रीने, सध्या गाजवतेय ओटीटी प्लॅटफॉर्म...
5 ऑगस्ट 1999 रोजी मुंबईत जन्म झालेल्या अहसास चन्नाची कौटुंबिक पार्श्वभूमी ही पंजाबी कुटुंबाची आहे. तिचे वडील इक्बाल सिंह चन्ना हे चित्रपट निर्माते आहेत. तर, आई कुलबीर कौर ही अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री अहसास चन्नाने मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. अहसासने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. वास्तुशास्त्र (2004) हा तिचा पहिला चित्रपट होता. यामध्ये तिने सुष्मिता सेनच्या मुलाची भूमिका केली होती.
अहसास चन्नाने 'माय फ्रेंड गणेशा', 'फुंक' आणि 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या चित्रपटात काम केले. बालकलाकार म्हणून काम करताना अहसास ही चित्रपटात फक्त मुलांचीच भूमिका करत असे. 2008 नंतर तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
अहसास चन्नाने नंतर 'देवों के देव...महादेव' (2014) मध्ये महादेव आणि पार्वतीच्या मुलीची भूमिका साकारली. यानंतर एहसासने एमटीव्हीच्या काही शोमध्ये काम केले.
अहसास चन्नाने 'कसम से', 'सावधान इंडिया', 'मधुबाला-एक इश्क एक जुनून', 'फियर फाइल्स', 'ओये जस्सी', 'क्राइम पेट्रोल' आणि 'दस्तक' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
2017 च्या सुमारास, अहसास टीव्हीएफ सोबत (TVF) जोडली गेली. त्यांच्यासोबत तिने अनेक सुपरहिट वेब सीरिजमध्ये काम केले. या वेब सीरिजमुळे अहसास चन्ना ही ओटीटी स्टार झाली.
अहसास चन्नाने 'गर्ल्स हॉस्टेल', 'कोटा फॅक्टरी', 'हॉस्टेल डेज', 'द इंटर्न्स', 'क्लच', 'जुगादीस्तान', 'मॉडर्न मुंबई' आणि 'हाफ सीए' सारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.